पुणे शहरात गेल्या 24 तासात 239 कोरोनाबाधितांची नोंद


पुणे : गेल्या 24 तासात पुणे शहरात 239 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली. शहरामध्ये सध्या 3 हजार 320 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे पुणेकरांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला असून शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

आजपर्यंत पुणे शहरात 4 लाख 73 हजार 539 एवढे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 61 हजार 763 एवढे रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात पुण्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8456 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील विविध केंद्रावर आज दिवसभरात 6076 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 519 रुग्ण गंभीर आहेत. तर 923 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरात आजपर्यंत 25 लाख 67 हजार 412 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.