नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात पाहायला मिळत असून देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. पण, कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 62 हजार 224 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; पण मृतांची आकडेवारी चिंताजनक
दरम्यान, देशात काल दिवसभऱात 28,00,458 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ज्यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा 26,19,72,014 वर पोहोचला आहे. तसेच भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) यांनी सांगितले आहे की, भारतात काल कोरोना चाचणीसाठी 9,30,987 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण 38,33,06,971 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत.