बीएमडब्ल्यू एस १००० आर नेकेड स्पोर्ट्स बाईक लाँच

जर्मन लग्झरी वाहन कंपनी बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने मंगळवारी भारतात त्यांची २०२१, एस १००० आर नेकेड स्पोर्ट्स बाईक लाँच केली असून बेसिक मॉडेलची किंमत एक्स शो रूम १७ लाख ९० हजार रुपये आहे. सर्व बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया डीलर्स कडे या बाईकचे बुकिंग सुरु झाले आहे.

या संदर्भात बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावा म्हणाले, ऑल न्यू बीएमडब्ल्यू एस १००० आर सेकंड जनरेशन पॉवर पॅक रोडस्टार असून शानदार रायडिंग डायनॅमिक्स, अधिक सुरक्षा आणि रोजच्या व्यावसायिकतेसह रायडिंग शौकिनांसाठी उत्तम बाईक आहे. अनेक रंगात ती उपलब्ध केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मॉडेलप्रमाणेच ही बाईक आहे.

बाईकचे एक्स्टीरीअर अतिशय शानदार असून ६.५ इंची टीएफटी मल्टीफंक्शनल इन्स्ट्रुमेंट पॅनल तिला दिले गेले आहे. स्टँडर्ड, प्रो आणि प्रो एम स्पोर्ट अश्या तीन व्हेरीयंट मध्ये ही बाईक मिळू शकणार आहे. त्यांच्या किंमती अनुक्रमे १७.९०, १९.७५ आणि २२.५० लाख अश्या असून त्या सर्व एक्स शो रूम आहेत.

या बाईकला युरो ५/ बीएससी ६ इंधन उत्सर्जनचे ९९९ सीसी इनलाईन ४ सिलिंडर लिक़्विड कुल इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ही बाईक ३.२ सेकंदात घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी २५० किमी. रेन, रोड, डायनामिक आणि डायनामिक प्रो अश्या चार रायडिंग मोड मध्ये ही बाईक उपलब्ध आहे.