भारतासह १०० देशातून कुत्री आणण्यावर अमेरिकेची बंदी

अमेरिकेत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या ६ लाखपार पोहोचली असतानाच कुत्र्यामुळे होणाऱ्या रेबीजचा फैलाव अमेरिकेत होऊ नये म्हणून भारत, डोमिनिक रिपब्लिक, कोलंबिया, चीन, रशिया सह जगातील १०० देशातून कुत्री आणण्यावर निर्बंध घातले गेले असल्याचे समजते.

अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने अमेरिकेला जीवघेण्या रोगांपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. जगभरातून दरवर्षी साधारण १० लाख कुत्री अमेरिकेत आणली जातात. नव्या नियमामुळे दरवर्षी आणल्या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या १ लाखाने कमी होणार आहे. हाय रिस्क देशातून आणल्या जाणाऱ्या कुत्रांची संख्या २०२० पासून दोन वर्षांच्या तुलनेत ५२ टक्के कमी होणार आहे.

अर्थात कुत्र्यांच्या प्रवेशावर निर्बंध घातले गेले असले तरी काही अटी पाळून कुत्री आणता येणार आहेत. कुत्र्याचे वय, त्याला रेबीजचे इंजेक्शन दिल्याचे प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक आहे.