अमेरिकन स्पेस कमांडने गुप्तपणे केला सॅटलाईट लाँच

अमेरिकेच्या स्पेस कमांडने एक खास मिलिटरी सॅटलाईट लाँच केला असून याचे प्रक्षेपण अतिशय गुप्तपणे केले गेले. स्पेस फोर्सच्या गुप्त खास प्रोजेक्ट युनिटने ओडिसी नावाचा हा सॅटलाईट लाँच केला. हा सॅटलाईट नॉरथॉप ग्रुमन पेगासस रॉकेटसह स्टारगेझर एल १०११ कॅरीअर जेटच्या खाली लावला गेला होता.

ओडिसी हा सर्व्हेलन्स (पाळत ठेवणारा) उपग्रह असून अंतराळात फिरणाऱ्या बाहेरच्या ऑब्जेक्ट ओळखू शकतो. स्पेस फोर्सचे चीफ ऑफ स्पेस ऑपरेशन जनरल जॉन रेमंड यांनी संस्थेला एक आव्हान दिले होते. त्यानुसार एक वर्षात संस्थेने निश्चित वेळात उपग्रह तयार करून लाँच करण्याची क्षमता मिळवायची होती. त्यानुसार एक वर्षात या उपग्रहांचे सुटे भाग तयार करून तो लाँच केला गेला. या संदर्भातला कोणताही व्हिडीओ शेअर केला गेलेला नाही. स्पेस फोर्सने हे उड्डाण गुप्त ठेवले होते.

जगातील हा पहिला खासगी पातळीवर विकसित केल्या गेलेल्या व्यावसायिक स्पेस लाँच व्हेईकल आहे. येथून आत्तापर्यंत ४५ वेळा लाँचिंग केले गेले असून ९० उपग्रह अंतराळात पाठविले गेले आहेत. अंतराळात हत्यारांची तैनाती म्हणून या सॅटलाईट लाँच कडे पाहिले जात आहे.