अंतिम फेरीत पोहोचून करोना झाला तर खेळाडूला मिळणार ऑलिम्पिक पदक

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आयओसीने खेळ नियमासबंधित प्ले बुकची तिसरे संस्करण प्रकाशित केले असून त्यानुसार अंतिम फेरीत पोहोचल्यावर एखाद्या खेळाडूला कोविड संसर्ग झाला तर त्याला स्पर्धेबाहेर न काढता त्याला रजत पदक दिले जाणार आहे.

टेनिस, बॅडमिंटन या सारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेसाठी हा नवा नियम केला गेला आहे. प्रत्येक खेळाबाबत कोविड १९ मुळे काही नियम बदल केले गेल्याचे प्ले बुक प्रकाशन प्रमुख किट मेककोनेल यांनी सांगितले. त्यानुसार ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला एखादा खेळाडू करोना संसर्गामुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही तर त्याच्या नावापुढे डीसक्वालीफाईड ऐवजी डिड नॉट स्टार्ट असे लिहिले जाणार आहे. कारण करोना संसर्ग होणे हा त्याचा किंवा त्याच्या टीमचा दोष नाही असे ते म्हणाले. याच कारणाने एखाद्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले तर त्याच्या पेक्षा वरच्या रँकचा अॅथलिट योग्य नसले तर संबंधित खेळाडूची जागा रिकामी ठेवली जाईल.

अर्थात कोणत्याही खेळाडूने करोना नियमावलीचे उल्लंघन केले तर त्याला निलंबित केले जाणार आहे असेही किट यांनी स्पष्ट केले.