विराट कोहलीच्या संपत्तीत आहेत या मूल्यवान वस्तू

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली एक वर्षात सर्वाधिक कमाई करणारा जगातील एकमेव क्रिकेटर ठरला आहे. त्याची एका वर्षाची कमाई १९६ कोटी असून तो श्रीमंत क्रिकेटर खेळाडूंच्या यादीत वरच्या नंबरवर आहे. विराट लग्झरी लाईफस्टाईलने जगतो. त्याच्या एकूण संपत्तीत काही वस्तू अतिशय मौल्यवान आहेत. अशा सहा वस्तू कोणत्या याची माहिती विराटच्या चाहत्यांसाठी देत आहोत.

फिनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीत विराट बेन्टले फ्लाईंग स्पर कारचा मालक आहे. या कारची किंमत ३ कोटी ९७ लाख आहे. विराटच्या ताफ्यात ऑडी सारख्या अनेक महागड्या अलिशान कार्स आहेतच पण त्याच्याकडे असलेली बेंटले कॉन्टीनेंटल ही ४ कोटी ६० लाखची कार त्याची सर्वात आवडती कार आहे.

विराटचे मुंबईच्या वरळी भागात अलिशान घर आहे. ७१७१ चौरस फुटाच्या या घराची किंमत ३४ कोटी असून ते विराटने २०१६ मध्ये खरेदी केले होते. हरियाना गुरुग्राम मध्ये विराटचा अलिशान बंगला आहे. त्याची किंमत ८० कोटी आहे. या बंगल्यात जिम, स्वीमिंग पूल सारख्या सुविधा आहेत.

विराट जे वॉलेट वापरतो, तेही असेच महागडे आहे. तो लोएस मोथीतोंजी ब्रांडचे वॉलेट वापरतो आणि त्याची किंमत आहे ८५ हजार रुपये. विराटच्या मालकीचे खासगी जेट आहे आणि त्याची किंमत १२५ कोटी आहे. विराट पत्नी अनुष्काला फिरविण्यासाठी हे विमान वापरतो असे सांगितले जाते.