करोनाचे नवे व्हेरीयंट, डेल्टा प्लस

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने फारच कहर केला पण ही लाट आता ओसरू लागल्याने अनेक राज्ये अनलॉकच्या दिशेने वाटचाल करू लागली असताना भारतात करोनाचे नवे व्हेरीयंट सापडले आहे. या नव्या व्हेरीयंट ला वैज्ञानिकांनी डेल्टा प्लस किंवा एवाय १ असे नाव दिले आहे. भारतात सापडलेल्या डेल्टा विषाणूचे संक्रमण फारच वेगाने होत असून या विषाणू मधूनच नवा विषाणू उदयास आला आहे असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार डेल्टा प्लस करोनाच्या डेल्टा किंवा बी १.६१७.२ चे म्युटेशन आहे. डेल्टा सर्वप्रथम भारतातच आढळला होता आणि दुसऱ्या करोना लाटेसाठी जबाबदार ठरला होता. म्युटेट झालेला नवा विषाणू किती गंभीर आजार पसरवू शकेल याचे संकेत अजून मिळालेले नाहीत. मात्र नव्या विषाणूमुळे भारतात चिंतेचे कारण नाही असे वैद्यानिकांचे म्हणणे आहे.

हा विषाणू भारतात नुकत्याच मान्यता मिळालेल्या मोनो क्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचारांना दाद देणार नाही असे सांगितले जात आहे. ज्यांना लस घेतल्यावर करोना झाला त्यांच्या रक्त प्लाझ्मा मधून या विषाणूची चाचणी झाल्याचे समजते. हा नवा विषाणू करोना प्रतिबंधक क्षमतेला चकवू शकेल काय यावर अध्ययन केले जात आहे.