मिल्खा सिंह यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन


नवी दिल्ली : कोरोनामुळे भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे निधन झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. निर्मल कौर या 85 वर्षाच्या होत्या. 19 मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. निर्मल कौर या हॉलीबॉल खेळाडू होत्या. भारतीय महिला व्हॅालीबॅाल संघाच्या त्या कर्णधार होत्या.

20 मे रोजी मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती असून PGIMER चंदीगढमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जून रोजी मिल्खा सिंह यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली होती. त्यांना लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या खेळाडूंना आशीर्वाद व प्रेरणा मिळविण्यासाठी लवकरच परत येईल अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली होती.