नोवाक जोकोविचने रचला इतिहास; जिंकला 19वा ग्रँडस्लॅम खिताब


पॅरिस : पुन्हा एकदा जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने इतिहास रचला आहे. जोकोविचनेफ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत ग्रीक युवा खेळाडू स्टेफानोस त्सिटिपासचा पराभव केला आहे. जोकोविचने पॅरिसमध्ये खेळवण्यात आलेल्या या अंतिम लढतीत त्सिटिपासचा 6-7(6), 2-6, 6-3, 6-2, 6-4 ने पराभव केला. त्यासोबतच जोकोविचने आपल्या कारकिर्दीतील 19वा ग्रँडस्लॅम खिताब आपल्या नावे केला आहे.

चार तासांहून अधिक वेळ फिलिप कार्टर सेंटर कोर्टवर सुरु असलेल्या या फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत जोकोविचने 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 ने त्सिटिपासचा पराभव करुन दुसऱ्यांदा हा खिताब आपल्या नावे केला आहे. जोकोविचला टक्कर देण्याचा त्सिटिपासनेही प्रयत्न केला आणि पहिले दोन सेट 7-6, 6-2 नी आपल्या नावे केले. यावेळी प्रेक्षकांना असे वाटत होते की, जोकोविचचा आता फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत पराभव होणार आहे. परंतु, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोकोविचने वापसी करत सामना आपल्या बाजूने वळवला आणि त्याने पुढील तीन सेट आपल्या नावे करुन फ्रेंच ओपनच्या खिताबावर आपले नाव कोरले.