१०० कोटींच्या घरात आहे मास्टरब्लास्टर सचिनचे वास्तव्य

भारतात क्रिकेटचा भगवान अशी ओळख असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याने क्रिकेट मध्ये अनेक रेकॉर्ड नोंदविली आणि प्रचंड संपत्ती तसेच प्रसिद्धी, लोकप्रियताही मिळविली. सचिनचे नाव श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत वरच्या स्थानी आहे. बालपणी साहित्य सहवास या छोटेखानी सोसायटीत राहणाऱ्या सचिनचे वास्तव्य आता अलिशान घरात आहे. मुंबईच्या प्रतिष्ठित बांद्रा पश्चिम भागात पेरी क्रॉस रोडवर सचिन अलिशान बंगल्यात त्याच्या कुटुंबासह राहतो.

२००७ मध्ये हा बंगला सचिनने ३९ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज या घराची किंमत १०० कोटी आहे. ६ हजार चौरस फुटाचे हे घर अनेक मजली आहे. त्यात दोन बेसमेंट आहेत. एक सुंदर बगिचा आहे. त्यात जगभरातील अनेक मौल्यवान झाडे झुडपे लावली गेली आहेत.

सचिन मुळात धार्मिक वृत्तीचा आहे आणि त्याच्या घरचे सदस्य सुद्धा वृत्तीने धार्मिक आहेत. यामुळे सचिनच्या घरात प्रशस्त जागेत देवघर असून त्याची सजावट अतिशय छान केली गेली आहे. एकूण घरातील इंटिरियर आणि फर्निचर अतिशय खास आहे. सचिनच्या घराचे अनेक फोटो यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत.