आपल्या रोजच्या वापरातील या वस्तू आहेत चांदीपेक्षाही महाग


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार व्हॅनिला आईस्क्रीमची चव घेताना हा विचार कधी मनामध्ये आला आहे का, की ह्या आईस्क्रीम मध्ये असेलले व्हॅनिला चांदीपेक्षाही जास्त किंमतीचे आहे ? हे अविश्वसनीय वाटत असले, तरी खरे आहे. आपल्या आवडत्या केक, कस्टर्ड, किंवा मिठाईला सुगंध आणि चव देणाऱ्या व्हॅनिलाची शेती जगातील उष्णकटिबंधीय देशांमध्ये होते. एक किलो व्हॅनिलाची किंमत एक किलो चांदीइतकी जास्त आहे. एक किलो व्हॅनिला पॉडस् ची किंमत सुमारे सहाशे डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलन जर पाहायचे झाले, तर एक किलो व्हॅनिला खरेदी करण्यासाठी आपल्याला सुमारे ४१,००० रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे मिठाईमध्ये वापरले जाणारे केशर हे देखील सर्वात महाग मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे. एक किलो केशराचे उत्पादन करण्यासाठी सुमारे दीड लाख फुलांची आवश्यकता असते. तसेच ह्या फुलापासून केशर तयार करण्याची प्रक्रिया देखील खूप जिकिरीची आहे. म्हणूनच एक ग्राम केशरासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाच ते पंचवीस डॉलर्स इतकी किंमत मोजावी लागते.


बाजारामध्ये आजकाल कॉफीच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. ह्या सर्व प्रकारांमध्ये चवीचा आणि अर्थातच क्वालिटीचा ही फरक असतो. कॉफीचे काही प्रकार चांदीच्या किंमतीपेक्षा जास्त महाग आहेत. इंडोनेशियामध्ये होणारी ‘कोपी लुआक’ नावची कॉफी आशियाखंडामध्ये सापडणाऱ्या ‘सिवेट’ जातीच्या मांजरींच्या मलापासून तयार केल जाते. ह्या मांजरींना कॉफीच्या बिया खायला घालून मग त्यांच्या मलापासून ही कॉफी तयार केली जाते. ही प्रक्रिया अतिशय मेहनतीची असल्याने ह्या कॉफीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सहाशे डॉलर्स प्रति किलोच्या भावापेक्षाही अधिक आहे.


व्हायाग्रा चे निर्माण १९८९ साली फायझर ह्या कंपनीने हायपरटेन्शनवर उपाय म्हणून केले. पण ह्या गोळ्यांवर प्रायोगिक पतीवर चाचण्या सुरु असताना ह्यांचे काही असामान्य दुष्परिणाम दिसून आले. ह्या गोळ्यांना २००२ साली अधिकृत रित्या मान्यता दिली गेली. त्यानंतर औषधे बनविणाऱ्या कंपन्यांसाठी व्हायाग्रा हे उत्पन्नाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून सिद्ध झाले. शंभर मिलीग्राम व्हायाग्राच्या गोळीची किंमत ऐंशी डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे. भारतामध्ये ही किंमत सुमारे चार ते पाच हजार रुपये इतकी आहे. त्वचेवर उठणारे पुरळ, खाज, खरुज ह्यांच्यासाठी लोक सामान्यतः स्कीन क्रीमचा वापर करतात. अमेरिकेमध्ये मिळणारे जोव्हीरॉक्स ह्या अँटी फंगल क्रीमच्या २ ग्रामच्या ट्यूब करिता ग्राहकांना भरपूर डॉलर्स मोजावे लागतात. त्याचप्रमाणे काही सौंदर्य प्रसाधनांची किंमत देखील चांदीच्या किंमतीइतकी आहे. ह्यापैकी ‘क्रेम ड ल मेर ‘ नामक क्रीम अतिशय प्रसिद्ध असून, अतिशय महागड्या क्रीम्स पैकी एक आहे. ह्या क्रीमच्या तीस मिलीलीटरच्या बाटलीची किंमत १६२ डॉलर्स इतकी आहे, तर ५०० मिलीलिटरच्या बाटलीकरिता तब्बल २,५०७ डॉलर्स मोजावे लागतात.

Leave a Comment