अबब… ! दारु बनवण्यासाठी केला जातो कंडोमचा वापर


दारु आणि सिगारेटसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या कॅरेबियन देशात असे प्रयोग केले जातात जे ऐकून तुम्ही नक्की थक्क व्हाल. कॅरेबियन देशात कंडोमच्या वापराने दारु तयार केली जाते. बसला ना शॉक… पण हे खरे आहे.

क्युबा येथील एक कुटुंब अतिशय विचित्र पद्धतीने दारु तयार करण्याचे काम करते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून ६५ वर्षीय ओरेटेस एस्टेवेज दारु बनवण्याचे काम करतात. ते यासाठी द्राक्ष, पेरु, आल्यासोबतच कंडोमचाही वापर करतात.

याबाबत त्यांनी सांगितले की, फ्रुट मिक्सला फरमेंट केले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या फ्लेवरच्या कंडोमने याला कव्हर केले जाते. फरमेंटेशनदरम्यान गॅस बनते आणि त्यात कंडोमचे काही फ्लेवरही मिसळले जातात. कंडोम जेव्हा फुगणे बंद होते तेव्हा समजावे की दारु तयार झाली आहे.

ओरेटस यांनी सांगितले आहे की, मिलीट्रीमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी दारु बनवण्याचे काम सुरु केले. त्यांची पत्नी आणि मुलगा या बिझनेसमध्ये त्यांची मदत करतात. त्यांची ही दारु फार पसंत केली जाते. त्याचबरोबर अनेक रेस्टॉरंटमधूनही त्यांच्या या दारुला फार डिमांड असते. ओरेटस सांगतात की दररोज ते अशा ५० बाटल्या विकतात.भलेही लोकांना ओरेटसची कंडोम वाईन आवडते पण याचा अनेक सोशल अॅक्टीवीस्ट विरोध करतात. त्यांच्या मानण्यानुसार अशी दारु बनवण्याने चुकीचा संदेश लोकांना दिला जातो. तर काही लोकांनी सांगितले की यासाठी ते इसेंसचाही वापर करु शकतात.

Leave a Comment