कार्दशियन बहिणी येथे १ रात्र घालवण्यासाठी खर्च करायच्या २२ लाख


आपण आजवर जगातील महागातील महाग हॉटेलबद्दल ऐकले असेल पण आम्ही आज तुम्हाला एका अशा व्हिला बाबत सांगणार आहोत ज्यामुळे थोडासा धक्का नक्की मिळेल. १२ बेडरूम आणि १३ बाथरूम असलेल्या कासा अरामारा व्हिला हा मॅक्सिकोमध्ये असून येथे एका रात्रीसाठी सुमारे २२ लाख रुपये मोजावे लागतात. अमेरिकन अभिनेत्री आणि सुपरमॉडेल किम कार्दशियन आणि तिच्या बहिणी याच व्हिलामध्ये भरपूर मौजमस्ती करतात. त्यांचा खास मित्र जो फ्रान्सिसचा हा व्हिला होता.

जो फ्रान्सिस हा व्यावसायिक आणि चित्रपट निर्माता आहे. फ्रान्सिसला त्याच्या एका भागीदाराने बिझनेस अकाउंटचे पैसे काढून स्वतःचे घर मेंटेन ठेवण्यासाठी वापरत असल्याच्या आरोपाखाली न्यायालयात खेचल्यानंतर न्यायालयाने फ्रान्सिसला २ मिलियन डॉलर आपल्या भागीदाराला देण्याचे आदेश दिले आणि त्याचा मालकी हक्कही काढून घेतल्यामुळे आता फ्रान्सिसच्या मैत्रिणी कार्दशियन बहिणी आता येथे फ्रीमध्ये पार्टी करण्यासाठी येथे जाऊ शकत नाहीत.

न्यायालयाने जो फ्रान्सिसची आर्थिक अडचण पाहून या आलिशान व्हिलाच्या माध्यमातून येणारे भाडे भागीदाराला २ मिलियन डॉलरची भरपाई होईपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. आपले मित्र आणि किम कार्दशियन बहिणीसोबत जो फ्रान्सिस येथे मोठमोठ्या पार्ट्या करत होता. रिकाम्या वेळेत हा व्हिला भाड्याने देत होता. येथे एक रात्र घालवण्यासाठी ३५००० डॉलर्स (२२ लाख रु) भाडे ठेवले होते.

Leave a Comment