प्रेमात पडाल तर लठ्ठ व्हाल!


तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर लक्ष द्या! अत्यंत मनापासून कोणावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपोआपच अंगावर मूठभर मांस चढते, असे शास्त्रज्ञांनीच सांगितले आहे. एका नव्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

स्थिर नातेसंबंधांमुळे वजन वाढत असते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. अधिक आरोग्यदायक आहार घेऊनही आणि फळे व भाजीपाल्याचाच आहार घेतल्यानंतरही जोडप्यांनी राहणाऱ्या व्यक्तींचे वजन एकटे राहणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त असते, असे या संशोधनातून दिसले आहे.

अर्थात यामागचे कारणही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. या व्यक्तींना एखाद्या संभाव्य जोडीदारावर छाप पडण्याची चिंता उरलेली नसते, त्यामुळे त्या लठ्ठ होऊ शकतात. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लोकांना जेव्हा आकर्षक किंवा बारीक दिसण्याची गरज राहिलेली नसते तेव्हा त्यांना अधिक खाण्यासाठी किंवा चरबी आणि शर्करा असलेले पदार्थ खाण्यात भीती वाटत नाही, असे या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या स्टेफानी शॉपे यांनी न्यू सायंटिस्ट या नियतकालिकाला सांगितले. मुले झाल्यावर तर या जोडप्यांचे वजन आणखीनच वाढते, कारण मुलांचे राहिलेले जेवण व खाद्यपदार्थ हे पालक खातात, असेही त्यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment