मद्यपींसाठी खुषखबर


दारु हे पेय नेमके कधीपासून वापरात आले आहे हे माहीत नाही पण वेदांमध्ये सोमरसाचा उल्लेख आहे तो सोमरस म्हणजे मद्यच होय. या पेयाचे अनेक दुष्परिणाम होतात पण तरीही तिच्या आहारी गेलेला माणूस तिला सोडत नाही. त्याला हे कळत असते की दारू पिण्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. मद्यप्राशन जास्त झाले की मनावरचा म्हणजेच मेंदूवरचा ताबा सुटतो आणि दारू पिणारा काहीही बरळायला लागतो. त्या नशेत तो काय बडबडत असतो हे त्यालाही कळत नाही पण नंतर तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याला लोक तो काय बडबडत होता याची माहिती देतात आणि तो बडबड्या चकित होतो कारण नशेत आपण काय बोलत होते हे त्याला कळलेले नसते.

मात्र आता शास्त्रज्ञांनी नवा शोध लावण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. त्या नुसार दारू पिणार्‍याच्या मनावर आणि मेंदूवर जे परिणाम होतात ते परिणाम शून्य करता येतात. त्यांनी अशी गोळी तयार केली आहे की ती घेतल्यानंतर दारूचा मेंदूवर कसलाही परिणाम होणार नाही. क्विन्सलँड युनिव्हर्सिटीच्या तंत्रज्ञान विभागात हे संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञांना हा गुण असलेली ही गोळी टँडोस्पायरोन या संयुगापासून तयार झालेली आहे. अर्थात यशस्वी झालेले हे प्रयोग उंदरांवर करण्यात आले आहेत आणि ते आता माणसावरही यशस्वी होतील अशी खात्री संशोधकांना वाटायला लागली आहे. या प्रयोगांत उदरांना आधी १५ आठवडे दारू पाजण्यात आली. तिचे त्यांच्या मेंदूवर झालेले परिणाम नोंदण्यात आले. नंतर दोन आठवडे हे औषध देण्यात आले. तेव्हा पंधरा आठवड्यात झालेला परिणाम कमी झालेला दिसला.

हे औषध मेंदूवर असा परिणाम करीत असेल तर त्याचे मेंदूवर होणारे सारे परिणाम अभ्यासून हे औषध अन्यही काही मेंदू विकारावर वापरता येईल काय याचाही अंदाज घेतला जात आहे. स्मरणशक्ती कमी होण्यासारखे काही आजार या औषधाने बरे करता येतील असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. टँडोस्पायरॉन हा घटक असा उपयुक्त ठरू शकतो असे प्रथमच दिसून आले आहे. अँक्झाइटी हा एक मानसशास्त्रीय आजार आहे. तोही या औषधानेे बरा होईल असे संशोधकांचे मत आहे. कारण माणसाच्या मेंदूवर मद्यपानाचा होणारा परिणाम हा अशाच मानसिक परिणामा सारखा असतो. हंी औषध सध्या केवळ चीन आणि जपान या दोन देशांतच उपलब्ध आहे या देशातल्या काही संशोधकांनी त्याचा असा वापर होऊ शकेल अशी शक्यताही व्यक्त केलेली होती. ती आता खरी ठरायला लागली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment