या कारणासाठी ब्रिटनची महाराणी कोहिनूरसोबतच ही खास वस्तू सोबत घेऊन गेली


मौल्यवान हिरा कोहिनूर ब्रिटनची महाराणी क्वीन व्हिक्टोरिया आपल्या सोबत घेऊन गेली. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण ही राणी या हि-याव्यतिरिक्त आणखी एक अशीच वस्तू घेऊन गेली. त्यांना ही वस्तू एवढी आवडली की त्यांनी ते सोबत घेऊन जाणे पसंत केले. फार कमी लोकांना या वस्तूबाबत माहित आहे. तो होता एक दगड ज्याला शजर म्हणतात.

या शजर दगडाबाबत सांगितले जाते की, कधीच एकसारखे हे दोन दगड नसतात. आजही आपल्या सुंदरतेसाठी हे दगड प्रसिद्ध आहेत. जर भारताबाबत बोलायचे झाल्यास बांदा येथील केन नदीच्या किना-यावर या प्रकारचे दगड आढळतात. ज्वेलरी, वाल हॅंगिंग आणि ताजमहल सारख्या कलाकृती बनविण्यासाठी हे दगड वापरले गेले आहे.

या दगडांना सुमारे ४०० वर्षापूर्वी भारतात आलेल्या अरबी लोकांनी ओळखले. या दगडावर झाडे, पत्तीच्या आकृतीमुळे याला शजर नाव दिले गेले. पर्शियन भाषेत शजर नावाचा अर्थ झाड असा होतो. यानंतर मुगल शासन काळात या दगडांनी अनेक कलाकृती बनवल्या गेल्या.

कुराणमधील आयतें काही मुस्लिम लोक या दगडाने लिहतात. काही लोकांचे म्हणणे आहे या दगडाचा वापर आजार बरा करण्यासाठी केला जातो. शजरची ही खासियत असल्याने बांदा येथून हा दगड संपूर्ण जगभर जातो. खासकरून इराणमधून याची मोठी मागणी असते.

Leave a Comment