सहा बोटे असणाऱ्या व्यक्ती करतात अधिक वेगाने काम


अनेकांना जन्मतःच हाताला किंवा पायांना सहा बोटे असतात. अश्या लोकांना पायमोजे, बूट किंवा हातमोजे घालताना अडचणींचा सामना करावा लागतो हे आपण पाहतो. पण या लोकांची एक जमेची बाजू आहे आणि ती फार महत्वाची आहे याची अनेकांना माहिती नसेल. जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ फ्रीबार्ग अँड इम्पिरिअल कॉलेज मध्ये संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे आढळले कि ज्यांच्या हाताना अथवा पायांना सहा बोटे आहेत ते सामान्य पाच बोटे असलेल्या लोकांपेक्षा अधिक वेगाने आणि अधिक चांगले काम करू शकतात. सहा बोटे असणे हा आजार नाही. या लोकांना पॉलीडेक्टीली असे म्हटले जाते.


संशोधन आणि त्यासंदर्भात गोळा झालेल्या आकडेवारीतून असे दिसून आले कि साधारणत ८०० लोकांमध्ये एकाला सहा बोटे असतात. त्यातील ५०० पैकी १ या बोटाची सर्जरी करून ते काढून टाकतात. मात्र या लोकांमध्ये मेंदूचे संतुलन अधिक चांगले असते आणि त्यामुळे ते कोणतेही काम अधिक वेगाने आणि अधिक चांगले करू शकतात. या वैज्ञानिकांच्या मते भविष्यात काम करणारे रोबो सहा बोटांचे असू शकतील.


नेचर कम्युनिकेशन मध्ये सादर झालेल्या रिपोर्ट नुसार हे सहावे बोट बहुदा अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये असते. बुटाची लेस बांधण्यापासून टायपिंग, पुस्तकाची पाने उलटणे, मोबाईल व्हिडीओ गेम खेळणे हे लोक अधिक वेगाने करतात. प्रोफेसर एतीने बर्डेट यांच्या म्हणण्यानुसार सहा बोटे असलेल्या माणसांबाबत अधिक अभ्यास केला गेला नव्हता. त्यामुळे त्याची वैशिष्टे कधी समोर आली नव्हती.


भारतापुरते बोलायचे तर सहा बोटे असलेल्या माणसांबद्दल काही मिथके आहेत. असे लोक भाग्यशाली मानले जातात आणि त्याला ठोस पुरावा म्हणजे बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि अॅथलीट स्वप्ना बर्मन. हृतिकच्या हाताला सहा बोटे आहेत आणि त्याच्या व्यवसायात तो चांगलाच यशस्वी आहे तर स्वप्नाच्या पायाला सहा बोटे आहेत आणि तिने जकार्ता एशियन गेम्स मध्ये प्रथमच भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले आहे. अर्थात तिचा सहा बोटांचा प्रकार पॉलीडेक्टीली तीन या गटात मोडतो. यात या सहाव्या बोटात मास आणि हाड असते.

Leave a Comment