विमान प्रवास करता? मग उपयोगी पडेल ही माहिती


आजच्या घडीला प्रवासाचा वेळ वाचवा यासाठी विमान प्रवास करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. विमानाविषयी अनेकांना कुतूहल असते तसेच एकदा विमान प्रवास केला की हा हायफाय प्रवासाची गंमत कमी होते. कारण विमान प्रवास हा एकसुरी असतो आणि त्यामुळे अनेकदा कंटाळवाणा होतो.

विमानात मागच्या बाजूची मधली सीट सर्वात सुरक्षित असते. अपघात घडला तर ही सीट सुरक्षित आहे. विमान उतरताना टायर्स जोरात घासले जातात तरी हे टायर्स प्रत्येक उड्डाणावेळी बदलावे लागत नाहीत. या टायरची क्षमता ३८ टनी वजन ताशी १७० मैल वेगाने झेलण्याची असते. विमानाचे टायर बदलताना कार्स किंवा अन्य वाहनाप्रमाणे जॅक लावून बदलले जातात. विमान रात्रीच्या वेळी उतरविताना आतील दिवे मंद केले जातात. प्रवाशांच्या डोळ्यावर विमानातून उतरल्यावर ताण येऊ नये यासाठी असे केले जाते. विमानात स्मोकिंग करता येत नाही.


बरेचदा पावसाळ्यात आकाशात विजा कडाडत असताना विमानातून आपण प्रवास करत असलो तर भीती वाटते. पण विमानाचे डिझाईन असे केलेले असते कि ज्यामुळे विमानावर आकाशीय विजेचा परिणाम होत नाही. अर्थात वर्षातून एकदा तरी कोणत्या न कोणत्या विमानाला विजेचा झटका बसतो पण त्यामुळे विमान पडत नाही. १९६३ नंतर विजेच्या स्पर्शामुळे विमानाला अपघात झाल्याची एकही घटना घडलेली नाही.


विमानातील खाद्यपदार्थ बेकार चवीचे असतात असा अनेकांचा अनुभव आहे. पण याचे कारण म्हणजे विमान उंचावर गेल्यावर वातावरणातील बदलामुळे खाद्यपदार्थ कमी गोड लागतात तर खारे पदार्थ कडवट लागतात. विमानात आणीबाणीसाठी ऑक्सिजन मास्क पुरविले जातात मात्र यातील ऑक्सिजन फक्त १५ मिनिटे पुरेल इतकाच असतो. विमान उद्योगात इंग्लिश भाषा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून वापरली जाते. विमानाचे ८० टक्के अपघात उड्डाण केल्यावर ३ सेकंदात अथवा लँड करतानाच्या शेवटच्या ८ मिनिटात होतात असे दिसून आले आहे. सर्वात मोठा विमान अपघात १९७७ साली रनवेवर पूर्ण क्षमतेने भरलेली दोन विमाने एकमेकावर धडकून झाला होता आणि यात ६०० पैकी ५०० प्रवासी मृत्युमुखी पडले होते.


अनेक विमान कंपन्या पायलट आणि को पायलट साठी एकच जेवण देत नाहीत. या मागे असे कारण आहे कि जर समजा या जेवणामुळे एक पायलट आजारी झाला तर दुसरा विमान उडवू शकतो.

Leave a Comment