२०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी गुजराथ सज्ज

२०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत गुजराथ यजमानपदाच्या शर्यतीत सामील होण्याच्या प्रयत्नांत असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली असल्याचे सांगितले जात आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम ‘ नरेंद्र मोदी स्टेडियम’ अहमदाबाद येथे तयार आहे आणि तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविध विकसित केल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर शेजारी सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह मध्ये फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कब्बडी, बॉक्सिंग, लॉन टेनिस साठी जागतिक दर्जाची मैदाने विकसित केली जात आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धांसाठी आवश्यक अन्य सर्व सुविधा विकसित करण्यासाठी अहमदाबाद नागरी विकास प्राधिकरण म्हणजे औडाने सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले असून त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. तांत्रिक कुशल आणि अनुभवी सल्लागार एजन्सीचा शोध सुरु आहे. उन्हाळी ऑलिम्पिक बरोबरच अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली गेली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद मध्ये आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होऊ शकतात असा दावा केला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली यासाठी तयारी सुरु असून गुजराथ सरकार सहयोग करत असल्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सांगितले आहे.