कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकले पुणेकर…! पण काळजी आवश्यक


पुणे – पुण्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जरी झपाट्याने वाढ होत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. पण पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे पुण्यात आज नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद कमी अन् कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचे या कमी झालेल्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.

आज दिवसभरात पुण्यात 333 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 535 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आज 22 जणांचा मृत्यु झाला आहे, तर यामध्ये 12 जणांचा समावेश आहे.