विज्ञानानेही मानले रुद्राक्षाचे गुणधर्म

भारत साधू संत बैरागी याचा देश म्हणून ओळखला जातो. या जमातीच्या हातात, गळ्यात रुद्राक्ष माळा असणारच. भारतात जप करण्याची प्रथा जुनी आहे आणि जपाच्या वेळी अनेकजण रुद्राक्ष माळ वापरतात. हिंदू धर्मात रुद्राक्ष पवित्र मानला जातो कारण त्याचा थेट संबंध भगवान शिवाशी आहे. धर्मग्रंथातून रुद्राक्षाला खूप महत्व दिले गेले आहे. रुद्राक्षाचे जे गुण सांगितले जातात त्याला आता विज्ञानाकडून सुद्धा मान्यता मिळाली आहे.

इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा मधील वैज्ञानिकांनी रुद्राक्षाचा मस्तकाला मोठा फायदा होतो असे म्हटले असून त्यातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवरचा शरीरावर जादू सारखा परिणाम होतो असे त्यांच्या अनुभवास आले आहे.

भारतात प्राचीन काळापासून रुद्राक्षाचे फायदे माहिती आहेत. रुद्राक्ष घातले की शारीरिक आणि मानसिक बळ वाढते, आरोग्य चांगले राहते. हृदयावर त्याचा अधिक परिणाम होतो आणि शरीरातील समस्या दूर होतात असे मानले जाते. १ मुखी रुद्राक्ष अतिशय दुर्मिळ आहे. असे रुद्राक्ष कमी संखेने सापडतात म्हणून त्यांची किंमत जास्त असते. हा रुद्राक्ष धारण करण्याने हृदय रोग दूर होतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते.

अध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात पंचमुखी रुद्राक्ष पुरुष, महिला मुले यांनी वापरावा. याच्या वापराने सामान्य आनंद, स्वास्थ्य, रक्तदाब नियमित राहणे आणि स्नायू सतर्क राहण्यास मदत होते. १४ वर्षाखालील मुलांना ६ मुखी रुद्राक्ष उपयुक्त ठरतो कारण तो शांत आणि एकाग्र होण्यास मदत करतो.

रुद्रक्षातील चुंबकत्व शरीरातील नसांचा थकवा दूर करते आणि शरीरात कुठेही वेदना होत असतील तर त्या दूर करते. माणसाच्या शरीरातील नकारात्मक उर्जेपासून रुद्राक्ष बचाव करते. माणसाच्या मनावर खूप ताण असेल तर शरीर जादा उर्जा निर्माण करते आणि ही उर्जा जाळली गेली नाही तर रक्तदाब, चिंता ही समस्या येते. रुद्राक्ष ही उर्जा शोषून घेते आणि हार्मोनचे संतुलन राखते.

भारतात छतीसगढ़ मध्ये रुद्राक्ष शेतीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.