जगाला संकटात टाकणाऱ्या करोना विषाणूचे इतके आहे वजन

साऱ्या जगाला आपल्या कब्जात घेतलेल्या करोना विषाणू मुळे नागरिकांना नको हे जीवन असे वाटू लागले आहे. मात्र इतक्या पॉवरफुल विषाणूचे नक्की वजन किती असेल हे शोधण्याचा उपद्व्याप इस्रायलच्या विझमॅन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील वैद्यानिकांनी केला असून जगात सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण करोना विषाणूंच्या वजनाचा अंदाज केला आहे.

जगात जेथे जेथे हे संक्रमण फैलावले तेथे कोणत्याही जागी १० लाख ते १ कोटी संक्रमित झाले हा आधार या संशोधनासाठी मानला गेला. पूर्ण जगभर पसरलेल्या करोना विषाणूचे वजन त्यावरून ठरविले गेले. सध्या संक्रमित रुग्णात जेवढा करोना विषाणू आहे त्याचे वजन ०.१ ते १० किलो ग्राम इतके असू शकेल असा अंदाज या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

या संशोधनात सहभागी झालेले वैज्ञानिक रॉन मिलो म्हणतात, करोना विषाणूचे वजन कमी आहे म्हणून त्याचा धोका कमी आहे असे नाही. जगात करोनाचे १७.३ कोटी रुग्ण आढळले आणि ३७ लाखाहून अधिक त्यात मृत्युमुखी पडले आहेत. कोविड १९ चे संक्रमण जेव्हा अगदी उच्च स्तरावर होते तेव्हाच माकडांवर परीक्षणे केली जात होती. माकडांच्या फुफ्फुसे, टॉन्सील, पचन संस्था यामध्ये किती प्रमाणात विषाणू आहेत याची निरीक्षणे केली जात होती.

माकडांच्या उती मध्ये प्रतीग्राम किती विषाणू कण आहेत हे पाहून त्याची तुलना माणसांच्या उती द्रव्याशी केली गेली. जेव्हा विषाणूंचे वजन कमी भरले तेव्हा संक्रमण कमी होते. मात्र संक्रमण उच्च स्तरावर गेले तेव्हा हे वजन १० किलोवर असावे असा अंदाज वर्तविला गेला. संक्रमित व्यक्ती मध्ये १ मायक्रोग्राममध्ये १० मायक्रो विषाणू कण असावेत असे यावरून ठरविले गेले.