यामुळे कंगनाने मागील वर्षी भरला अर्धाच टॅक्स


नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत असते. तिने दिलेल्या विविध सामाजिक आणि राजकीय मुद्यांवरील प्रतिक्रियांमुळे अनेकदा वाद झाले आहेत. तिला यामुळे अनेकवेळा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. ट्विटरने देखील अलिकडचे कंगनावर कारवाई करत तिचे ट्विटर अकाऊंट संस्पेंड केल्यानंतर कंगना आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. खरंतर तिला यावर्षी टॅक्स भरायला उशीर झाला आहे. तिने याबाबतची माहिती स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.

यावेळी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगनाने एक स्टोरी अपलोड केली आहे. तिने ज्यामध्ये म्हटले आहे की, बॉलिवूडमधील सर्वाधिक टॅक्स भरणारी मी अभिनेत्री आहे. माझ्या उत्पन्नाच्या जवळपास 45 टक्के टॅक्स मी भरते. पण मागील वर्षी हाताला काम नसल्यामुळे टॅक्सचे अर्धे पैसे भरू शकले नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला टॅक्स भरण्यास विलंब झाला आहे. अशात सरकार उर्वरित टॅक्सवर व्याज आकारणार असेल, त्यांच्या निर्णयाचे मी स्वागतच करते. आमच्यासाठीही हा कठिण काळ असून आपण सर्वजण मिळून या काळावर देखील मात करू शकतो.