ही आहे जगातील सर्वात लोकप्रिय इमोजी

आपल्या भावना शब्दाऐवजी चिन्हांतून व्यक्त करण्याची सुविधा इमोजी मुळे उपलब्ध झाली आहे. सोशल मीडियावर इमोजीचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. पण जगातील सर्वात लोकप्रिय इमोजी कुठली असे विचारले तर गुगल सर्चचीच मदत घ्यावी लागेल. पण हे काम अमेरीकीच्या मिशिगन युनिव्हर्सिटी आणि पिकिंग विश्वविद्यालय यांनी आपल्यासाठी केले आहे. त्यांनी २१२ देशात ४.२७ कोटी मेसेजवर आधारित एक संशोधन करून त्यांचा अहवाल दिला आहे.

या अहवालानुसार आनंदाश्रु सह हसणारा चेहरा ही सर्वात लोकप्रिय इमोजी आहे. जगात प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे पण या इमोजीला प्रथम पसंती असून १५.४ टक्के नागरिक या इमोजीचा वापर करतात असे दिसून आले आहे. त्या खालोखाल हार्ट इमोजी आणि हार्ट आईज इमोजी अनुक्रमे दोन आणि तीन नंबरवर आहेत.

फ्रेंच नागरिक हार्ट इमोजीचा सर्वाधिक वापर करतात. अमेरिका, रशियात आनंदाश्रु सह हसणारा चेहरा अधिक लोकप्रिय आहे. ज्या देशातील नागरिक मस्त मजेत आणि खुश आहेत तेथे हॅपी इमोजी अधिक वापरली जाते. ऑस्ट्रेलिया, फ्रांस, चेक रिपब्लिक या देशाचा यात वरचा नंबर आहे.

इमोजी बहुतेक पिवळ्या रंगात अधिक आहेत. त्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. व्यक्तीच्या स्कीन टोनशी हा रंग जुळणारा आहे. पिवळा रंग उत्साह आनंदाचे प्रतिक आहे. खूप हसले तर माणसाचा चेहरा पिवळा दिसतो आणि या रंगात भावना अधिक चांगल्या व्यक्त होतात अशी काही कारणे त्यासाठी दिली जातात.