नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या तसेच इतरही काही व्यावसायिकी वेबसाईट्स काही काळ बंद पडल्या असून द न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल या साईट्सवर गेल्यावरही त्याठिकाणी देखील एकसारखाच एरर दाखवत आहे. या साईट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 503 हा एरर दाखवत आहे. पण यातील काही साईट्स हळूहळू ओपन होऊ लागल्या आहेत. तर काही साईट्स अद्यापही बंदच आहेत. हा एरर कशामुळे आला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या सर्व आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सला दाखवत आहे 503 हा एरर, जाणून घ्या कोणत्या आहेत साईट्स…
या आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स पडल्या आहेत बंद ?
- ब्रिटीन सरकारची जीओव्ही डॉट युके
- गार्डीयन
- फायनॅन्शियल एक्सप्रेस
- इंडिपेंडंट
- न्यूयॉर्क टाइम्स
- रेडिट
- अॅमेझॉन
- सीएनन
- फॅनडम
- हुलूलू
- ट्विचअप
- द वॉशिंग्टन पोस्ट
- वॉल स्ट्रिट जर्नल
- ट्विटर
- पे पल
- स्पॉटीफाय
- ई बे
- गीट हब
- पीनस्ट्रेस्ट
- स्वेअरस्पेस