जगातील पाच मूल्यवान ऑटो कंपन्यात टोयोटो अग्रणी

ऑटो क्षेत्रात अनेक प्रकारची वाहने बनविणाऱ्या शेकडो कंपन्या जगभर कार्यरत आहेत. पण व्यवसाय दृष्टीने यश आणि मूल्य असलेल्या ऑटो कंपन्या फारशा नाहीत. ऑटो इंडस्ट्रीच्या २०२१ च्या रिपोर्ट नुसार यंदाच्या वर्षात जगातील पाच मूल्यवान ऑटो कंपन्यांच्या यादीत टोयोटोने मर्सिडीजला मागे टाकून पहिले स्थान मिळविले आहे.

टोयोटोची ब्रांड व्हॅल्यू २०२० मध्ये ५८०७६ दशलक्ष डॉलर्स होती ती वाढून या वर्षी ५९४७९ दशलक्ष डॉलर्स वर गेली आहे. यामुळे टोयोटो जगातील सर्वात मोठी ऑटो कंपनी बनली आहे.

मर्सिडीज बेंझची ब्रांड व्हॅल्यू या वर्षात थोडी घटली आहे. २०२० मध्ये ६५०४१ दशलक्ष डॉलर्सवर असलेले कंपनीचे मूल्य या वर्षी ५८२२५ दशलक्ष डॉलर्सवर आले आहे. या यादीत तीन नंबर वर फोक्सवॅगन कंपनी आहे. या कंपनीची ब्रांड व्हॅल्यू २०२१ मध्ये वाढली आहे. ही व्हॅल्यू ३३८९७ दशलक्ष डॉलर्सवरून यंदा ४७०२० दशलक्ष डॉलर्सवर आली आहे.

या यादीत चार नंबरवर लग्झरी ऑटोमोबाईल साठी जगात प्रसिद्ध असलेल्या बीएमडब्ल्यूचा नंबर आहे. या कंपनीची ब्रांड व्हॅल्यू गतवर्षी पेक्षा थोडी घसरली आहे. गतवर्षी ती ४०,४८३ दशलक्ष डॉलर्स होती ती यंदा ४०,४४७ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे. पोर्शेची ब्रांड व्हॅल्यू सुद्धा या वर्षात वाढून ३४३२६ दशलक्ष डॉलर्सवर गेली आहे. २०२० मध्ये टो ३३९११ दशलक्ष डॉलर्स होती.