रशियात प्राण्यांवर सुरु झाले करोना लसीकरण

जगात अजूनही धुमाकूळ घालत असलेल्या कोविड १९ विषाणूचे संक्रमण वटवाघूळाच्या मधून माणसात आल्याचे सांगितले जात आहे मात्र आता हे संक्रमण माणसांकडून प्राण्यांच्या मध्ये पसरू लागले आहे. रशियाने हा धोका लक्षात घेऊन प्राण्यांसाठी करोना लस तयार केली आहे आणि प्राण्यांचे लसीकरण सुरु केले आहे. असे करणारा रशिया पहिला देश ठरला आहे.

रशियन वैद्यानिकांनी प्राण्यासाठी करोना लस विकसित केली आहे. या लसीचे नाव कोर्निवाक-कोव असे आहे. या लसीचे रजिस्ट्रेशन मार्च मध्येच केले गेले होते. ही लस प्राण्यांना करोना पासून १०० टक्के संरक्षण देईल असे सांगितले जात आहे. ९ मे पासून रशियन सेनेतील कुत्री आणि इतर प्राण्यांना ही लस दिली जात आहे. प्राण्यांसाठी बनलेली ही पहिली लस आहे असे पशुचिकित्सक सांगत आहेत.