फिलाडेल्फिया वार्षिक न्यूड बाईक रॅली मध्ये घालावा लागणार मास्क

जगात अनेक देशात अनेक हटके उपक्रम राबविले जात असतात. लोकांना अनेक चित्रविचित्र कल्पना सुचत असतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे न्यूड बाईक रॅली. जगातील अनेक देशात अश्या रॅली वार्षिक कार्यक्रम म्हणून होतात. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथेही वार्षिक नेकेड बाईक रॅली आयोजित केली जाते.

गतवर्षी करोना मुळे ही रॅली होऊ शकली नव्हती मात्र आता करोनाचा जोर ओसरला असल्याने यंदा २८ ऑगस्ट रोजी या रॅलीचे आयोजन केले गेले आहे. या रॅली मध्ये अंगावर एकाही कपडा घातला नसला तरी चालते मात्र यंदा करोना लक्षात घेऊन मास्क घालण्यास परवानगी दिली गेली आहे.

अर्थात २८ ऑगस्ट पर्यंत करोना आणखी कमी झाला तर मास्क लावणे, न लावणे बंधनकारक राहणार नाही असे आयोजक सांगतात. या शहरात कोविड नियम बरेच शिथिल केले गेले आहेत. दरवर्षी या स्पर्धेत हजारो स्पर्धक भाग घेतात. पार्क मध्ये जमून तेथे अंगावरचे कपडे काढले जातात आणि एकमेकांची शरीरे विविध रंगानी रंगविली जातात.

या रॅली आयोजनामागे शरीराविषयी पोझिटिव्ह प्रतिमा मनात ठेवणे, इंधन अवलंबित्व कमी करणे आणि सायकल सेफ्टी या विषयी जागृती केली जाते. ही रॅली १० मैल म्हणजे १६ किमीची असते.