हॅलो व्यतिरिक्त दुसरे काही फोन उचलल्यावर का बोलले जात नाही?


आपण फोन उचलल्यानंतर सर्वसाधारण हॅलो हाच शब्द उच्चारतो आणि मग महत्वाचे विषय बोलण्यास सुरुवात करतो. पण यापूर्वी कधी असा विचार केला आहे का फोन उचलल्यानंतर सर्वचजण हॅलोच का उच्चारतात ? त्यासाठी पर्यायी शब्द का उच्चारत नाही. यासंदर्भात वेगवेगळ्या दंतकथा आहेत. पण त्याला सत्याची जोड नाही. पण आम्ही आज तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.

अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा आविष्कार केला होता. त्यांना १० मार्च १८७६ मध्ये टेलिफोन आविष्काराचे पेटेंट मिळाले. बेल यांनी फोनचा आविष्कार केल्यानंतर सर्वातआधी त्यांचे मित्र वॉट्सन यांना एक संदेश पाठवला. प्रिय वॉट्सन येथे येशील का मला तुझी गरज आहे. हे फोनवर बोलताना ग्राहम बेल हे हॅलो नाही तर Ahoy असे बोलायचे.

टेलिफोनच्या आविष्कारानंतर लोकांनी जेव्हा याचा वापर सुरू केला, तेव्हा सर्वातआधी लोक विचारत होते की, Are you there. ते हे यासाठी करत होते की, त्यांना कळावे की, दुसरीकडे त्यांचा आवाज पोहोचतो आहे. पण असे म्हणतात की, थॉमसन एडिसन यांनी एकदा Ahoy हे चुकीचे ऐकले आणि त्यांनी १८७७ मध्ये हॅलो म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला.

थॉमस एडिसनने हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पिट्सबर्गच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट अ‍ॅन्ड प्रिंटिंग टेलिग्राफ कंपनीचे अध्यक्ष टीबीए स्मिथ यांना पत्र लिहून सांगितले की, ‘हॅलो’ हा टेलिफोनवर पहिला उच्चारला जाणारा शब्द असावा. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा फोन केला तेव्हा ते हॅलो असेच म्हणाले. फोनवर उचलल्यावर हॅलो म्हणण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली.

Leave a Comment