इन्स्टाग्रामवर सुरू केला अनोखा व्यवसाय, अवघ्या काही महिन्यात झाली २२ लाखांची कमाई!


आपल्यापैकी कित्येकजण आपल्या सहीला खूप महत्व देतात. आपली सही सगळ्यात हटके आणि वेगळी असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. आपल्या सहीवरुन आपले व्यक्तीमत्व कळते असे म्हणतात. पण रशियातील क्रायनोयार्क्समध्ये राहणाऱ्या २० वर्षीय इवान कुजिन या विद्यार्थ्याचे असेच काहीसे होते. पासपोर्ट काढण्यापूर्वी त्याची सही त्याला बदलायची होती. तो अनास्तासिया या मित्राकडे मदतीसाठी गेला.

चीनमधून अनास्तासिया हा कॅलिग्राफी शिकला आहे. कुजिनसाठी त्याने एक सिग्नेचर डिझाइन तयार केले. त्याचबरोबर ही सही कशी करायची हे सुद्धा शिकवले. सुंदर सही मिळण्यासोबतच एक जबरदस्त बिझनेस आयडिया सुद्धा कुजिनला सापडली. सही डिझाइनचा ऑनलाइन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतला.

आधीच एक कंपनी कुजिन याने रजिस्टर करून ठेवली होती. त्याने त्यानंतर नवा बिझनेस सुरू करण्यासाठी राइट टाइट नावाचे इन्स्टाग्राम हँडलही सुरू केले आणि १५ हजार रूबल(१६ हजार रूपये) ऑनलाइन मार्केटिंगवर खर्च केले. १२ तासांच्या आत त्यांना पहिले काम मिळाले. ग्राहकांची संख्या जेव्हा ४० पार झाली तेव्हा दोघांनी आणखी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला नोकरीवर ठेवले. राइट टाइटची सुरूवात २०१८ च्या डिसेंबरमध्ये झाली होती. या कंपनीचे उत्पन्न या २०१९ च्या एप्रिलपर्यंत ३०,५०० डॉलर(२२ लाख रूपये) पर्यंत पोहोचले होते.

जेव्हा राइट टाइटशी ग्राहक संपर्क करतात तेव्हा कंपनीकडून सर्वातआधी ग्राहकांचे संपूर्ण प्रोफाइल चेक केले जाते. ग्राहकांच्या शिक्षणावरून आणि त्यांच्या बिझनेसवरून त्यांना १० सह्या तयार करून दिल्या जातात. हे १० सॅम्पल जर रिजेक्ट झाले तर आणखी १० पर्याय दिले जातात. ग्राहक जेव्हा सही निवडतात तेव्हा कंपनी एक एज्युकेशन मटेरिअल तयार करते. ही सही कशी करायची हे ग्राहकांना शिकवले जाते. आता ग्राहकाकडून बेसिक सही डिझाइनसाठी कंपनी ५ हजार रूबल (५,३०० रूपये) फी घेते.

आता राइट टाइट कंपनीसाठी ८ कर्मचारी काम करत आहेत. कंपनीची स्ट्रॅटेजी, कर्मचाऱ्यांना घेणे आणि मॅनेजमेंटचे कुजिन हा काम बघतो. तर आर्टचे काम अनास्तासिया हा घतो. कुजिननुसार, आतापर्यंत जेवढे ग्राहक मिळाले, त्यातील जास्तीत जास्त हे मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गसारख्या शहरातील होते. काही ग्राहक जर्मनी, ब्रिटन, इस्त्राइल आणि अमेरिकेतीलही होते. त्याने सांगितले की, कंपनी आता कॅलिग्राफी आणि हॅंडरायटिंगशी संबंधित कोर्टही सुरू करणार आहे.

Leave a Comment