सोशल मीडिया हे एक असे साधन झाले ज्याद्वारे आपल्याला जगभरात घडणाऱ्या अनेक घडामोडींची माहिती चुटकीसरशी मिळते. त्यातच कोणती घटना व्हायरल झाली तर ती झटपट शेअर केली जाते. आता हेच बघा ना सोशल मीडियावर सध्या एका पर्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात काय नवीन आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, पण या पर्सचे असे वैशिष्ट्ये आहे कि ही पर्स चक्क माणसाच्या तोंडासारखी आहे. त्यामुळे ही पर्स सध्या नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
माणसाच्या तोंडासारखी असणारी ही पर्स पाहून तुम्हाला भीती वाटू शकते
जपानमधील डिजेने या अजब गजब पर्सचा व्हिडीओ डिजाइन केला आहे. ड्यू नावाच्या आपल्या इंस्टाग्रामवर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. छोट्याशा व्हिडीओमध्ये दिसत असलेली पर्स खूपच अजब गजब आहे. सिलिकॉन रबरने ही पर्स तयार केली आहे. हुबेहुब एखाद्या व्यक्तीच्या तोंडासारखेच त्याचे डिजाइन आहे. पर्समध्ये नाणी ठेवण्यासाठी ओठ उघडावे लागतात. विशेष म्हणजे पर्सवरील व्यक्तीचा चेहरा हुबेहुब दिसावा म्हणून पर्सच्या आतमध्ये दातही लावण्यात आले आहेत.