देशोदेशीच्या विचित्र तऱ्हा


जितके देश तितके वेश अशी एक म्हण आहे. जगभरातील विविध देशात असलेल्या विविध पद्धती, नियम, कायदे ऐकले तर जितके देश तितक्या विविध विचित्र तऱ्हा अशी नवी म्हण तयार होऊ शकेल. त्यातील काहीची झलक आमच्या वाचकांसाठी.

भारतात आपण होय म्हणताना आपली मान खालीवर हलवितो पण बुल्गेरीयात तुम्ही हीच कृती केली म्हणजे होय म्हणण्यासाठी मान खालीवर हलवली तर त्याचा अर्थ नाही किंवा नो असा आहे. भारतात नाही म्हणताना मान दोन्ही बाजूनी वळविली जाते. जगात १८ देश असे आहेत, जेथे एकही नदी नाही तर २२ देश असे आहेत ज्यांना स्वतःचे सैन्य नाही. रशिया हा सर्वाधिक प्राणवायू निर्माण करणारा जगातील एकमेव देश आहे. कारण रशिया आकाराने मोठा आहेच पण जगातील झाडांच्या एकूण संख्येपैकी २५ टक्के झाडे एकट्या रशियात आहेत.


फ्रांसमध्ये मृत व्यक्तीबरोबर लग्न करण्याची कायदेशीर परवानगी आहे. त्यासाठी एक अट अशी कि जिवंत व्यक्तीला मृत व्यक्तीचे तिच्यावर खरे प्रेम होते आणि त्याची लग्नाची तयारी होती हे सिद्ध करावे लागते. जपान मध्ये तुम्ही इमोशनल सिनेमा पाहायला जात असाल तर भाडोत्री सोबती घेऊ शकता. हा सोबती तुमच्याबरोबर सिनेमा पाहतो आणि तुम्ही भावनावेगाने रडत असाल तर तुमचे अश्रू पुसतो.


मलेशियामध्ये पिवळे टी शर्ट वापरण्यावर बंदी आहे. कारण तेथे काही वर्षापूर्वी विरोधकांनी पिवळे कपडे घालून निदर्शने केली आणि पंतप्रधानांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. नियु या बेटावर चलनी नाणी आणि नोटांवर मिकी माउसची प्रतिमा आहे. पूर्वी येथे नाण्यांवर पोकेमॉनची प्रतिमा होती. इथिओपियन कॅलेंडर जगाच्या सात वर्षे मागे आहे.


जगातील ६० टक्के सरोवरे कॅनडा मध्ये आहेत. भूतान मध्ये बहुतेक इमारतींवर पुरुष लिंग फोटो लावले जातात कारण तेथे ते समृद्धी आणि विकास याचे प्रतिक मानले जाते. लिबिया मध्ये ९० टक्के भाग वाळवंटी आहे.


भारताशिवाय फिजी हा असा देश आहे जेथे हिंदी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा आहे. अफगानिस्तान मध्ये जगातील ९९ टक्के अफू उत्पादन होते तर डेन्मार्क मध्ये सरकारने नवजात बाळांची नावे असणारी ७ हजार नावांची यादी तयार केली आहे त्यातून निवडून एक नाव बाळाला ठेवता येते.

Leave a Comment