या शाळेत होतो विद्यार्थ्याचा १ कोटी रुपये वार्षिक खर्च

le-rossey
तु्म्ही ऐकले तर त्यावर विश्वास बसणार नाही की स्वीत्झर्लंडमध्ये एक अशी आंतराष्ट्रीय बोर्डिंग शाळा आहे की ज्याचे वार्षिक शुल्क तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या शाळेचे नाव इंस्टीट्यूट ऑफ ले रोजे असे असून या शाळेतील एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. यात अॅकॅडेमिक फीसोबत बोर्डिंग, लॉजिंग आणि इतरही फीचा समावेश असतो.

या शाळेची स्थापना पॉल अॅमिली कार्नल यांनी १८८० साली केली होती. पाच विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या शाळेत असतो. येथील सर्व विद्यार्थी बोर्डिंग हाऊसमध्ये राहतात. शाळेच्या कॅम्पसमध्येच हे हाऊस आहे. येथील अभ्यासक्रम इंग्रजी आणि फ्रेंच या दोन भाषांमध्ये आहे. वेगवेगळ्या खेळांसाठी या कॅम्पसमध्ये ग्राऊंड, साहित्य आणि प्रशिक्षक उपलब्ध आहेत. येथील पहिल्या टर्ममध्ये घोडदौड आणि बॅटमिंटन, सेकंड टर्ममध्ये स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग आणि तिसऱ्या टर्ममध्ये टेनिस, डान्स क्लासेस घेतले जातात.

या शाळेचा समावेश जगातील सर्वांत जुन्या बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. राजघराण्यातील, बिझनेस क्लास, उच्च पदस्थ आणि धनाढ्य लोकांची मुले येथे शिकायला येतात. या शाळेत केवळ ४०० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. या संस्थेचे आणखी एक कॅम्पसही आहे. स्की रिसॉर्ट व्हिलेज जिस्टॅंडमध्ये हे तयार करण्यात आले आहे. हिवाळ्यात विद्यार्थ्यांना येथे शिफ्ट केले जाते. ही सुंदर शाळा हिलस्टेशनवर बांधण्यात आली आहे.

Leave a Comment