या वस्तूंची खरेदी करताना श्रीमंतही करतील विचार


जगात महाग अशी कोणतीही वस्तू खरेदी करायची तर त्यासाठी श्रीमंत असायला हवे. पैशाने सर्व काही खरेदी करता येते असा समज आहे. पण जगात अश्याही काही वस्तू आहेत कि मी मी म्हणणारे श्रीमंत त्या खरेदी करताना शंभर वेळा विचार करतील. कोणत्या आहेत या वस्तू?

सुप्रीम याच – हिस्ट्री सुप्रीम याच या नावाने ओळखले जाणारे हे याच बनविताना तब्बल १ लाख किलो सोने आणि प्लॅटीनम चा वापर केला गेला आहे. यातील वाईन ग्लास १८ कॅरेट हिऱ्यांचे असून यावर डायनॉसोरचा एक पुतळाही आहे. या याचची किंमत २८८०० कोटी असून हे याच नुसते पाहण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.


फेरारी जीटीओ –फेरारीच्या गाड्या तश्याही कोट्यावधी रुपये खर्च केल्यावर मिळतात. मात्र १९६३ साली लाँच झालेली फेरारी जीटीओ खरेदी करायची असेल तर २२४ कोटी रुपये मोजायची तयारी हवी. ही गाडी ज्याकुणी प्रथम खरेदी केली त्याचे नाव गुप्त ठेवले गेले होते. मात्र आता या गाडीच्या किमतीत ५० टक्के वाढ झाली असून ती जगातील सर्वात सुंदर व्हिंटेज कार बनली आहे.


घड्याळाची किंमत असून असून किती असेल असे वाटणे गैर नाही. मात्र तीन मोठ्या हिरयांपासून हृदयाच्या आकारात बनविले गेलेले हे घड्याळ १६० कोटी रुपयांचे आहे. यात २०१ कॅरेट रत्नांचा वापर केला गेला आहे. लांबून ते नुसते हिरे वाटतात.


बुगाटीची ही कार सोन्याची आहे. लंडनमध्ये ही कार असून तिची किंमत आहे ६४ कोटी. हि कार ० ते १०० किमीचा वेग फक्त २.८ सेकंदात घेते.
डोमेन- वेबसाईटवर स्वतःचे पेज करताना डोमेन नेम घ्यावे लागते. सर्वात महागडे डोमेन एका विमा कंपनीचे आहे. इन्शोअर डॉट कॉम हे ते डोमेन. या डोमेनची किंमत १०२.४ कोटी सांगितली जाते. हि कंपनी जीवन विमा, कार विमा, आरोग्य विमा देते.


पियानो- एका डच कंपनीने बनविलेला हा पियानो पूर्ण क्रिस्टलचा असून त्याची किंमत आहे २०.४८ कोटी. १९९६ साली तो बनविला गेला आहे.


ब्रेसलेट- डायमंडचा चित्ता असलेले हे ब्रेसलेट खास आहे कारण ते प्रिन्स एडवर्ड ८ आणि त्याची प्रियतमा वॉलीस सँपसन यांची आठवण आहे. जगातील हे महागडे ब्रेसलेट समजले जाते.

Leave a Comment