पॅथॉलॉजिस्ट व रेडिओलॉजिस्ट कबुतरे

peagon
कबुतर हा पक्षी शांततेचे प्रतीक म्हणून जगभर ओळखला जातो तसेच संदेशवहनांसाठीही त्यांचा यशस्वी वापर केला गेला आहे. नव्या संशोधनातून कबुतरे पॅथॉलॉजिस्ट व रेडिओलॉजिस्ट म्हणूनही कामगिरी बजावू शकतात हे आढळून आले आहे. हा शोध पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स या मासिकात प्रसिद्ध केला गेला आहे.

यात प्रशिक्षित कबुतरांना एक्सरे व मॅमोग्राफीचे फोटो दाखविले गेले तेव्हा त्यानी रेडिओलॉजिस्ट प्रमाणे स्ननांचा कर्करोग ओळखण्याची कामगिरी चोख पार पाडली. मॅमोग्राफीचे फोटो दाखविल्यानंतर त्यांनी कॅन्सरग्रस्त पेशी अतिशय कुशलतेने ओळखल्या मात्र ज्या गाठी धोकादायक असू शकतील असा संशय होता त्या गाठींचे निदान कबुतरे करू शकली नाहीत. कबुतरांमधील या क्षमतेचा उपयोग रोग निदान आणि इलाज करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल असा संशोधकांचा दावा आहे.

ओयावा विद्यापीठातील प्रोफेसर एडवर्ड वॉसरमन म्हणाले कबुतरे चेहरा पाहून भाव ओळखू शकतात. ती अक्षरे ओळखू शकतात तसेच मोनेट व पिकासो यांच्या चित्रांतील बारीक फरकही ओळखू शकतात हे संशोधनातून यापूर्वीच सिद्ध झाले आहे. आता ते कॅन्सरच्या गाठींचे निदान ही करू शकतात हे लक्षात आले आहे. कबुतराचा मेंदू माणसापेक्षा लहान असतो मात्र ती १८०० प्रकारचे फोटो लक्षात ठेवू शकतात. या कबुतरांना दोन आठवड्याचे प्रशिक्षण दिले असता त्यांनी ८५ टक्के यशस्वी कामगिरी केली.

Leave a Comment