जगातली सर्वात महागडी डिश

gold
दिल्ली – माशाच्या अंड्याला म्हणजे गाभोळीपासून बनविलेल्या पदार्थाची १ चमचा चव घेण्यासाठी कुणी २५ लाख रूपये मोजेल यावर विश्वास बसतोय? नाही? मग ऐकाच. जगातील सर्वात महागडी डिश न्यूयॉर्कसह अनेक मोठ्या शहरातील रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केली जाते आणि १ चमचाभर हा पदार्थ खाण्यासाठी श्रीमंत वर्ग चक्क २५ लाख रूपये आनंदाने मोजतो. या पदार्थाचे नाव आहे व्हाईट गोल्ड अल्बिनो केव्हीयर हा पदार्थ दुर्मिळ अशा अल्बिनो केव्हीयर माशाच्या गाभोळीपासून बनविला जातो आणि त्यात चक्क २२ कॅरेट सोने वापरले जाते.

हा पदार्थ शोधला आहे ऑस्ट्रीयातील मत्सशेती करणारे वाल्टर ग्रूएलर व त्यांचा मुलगा पॅट्रीक यांनी. ते म्हणाले हा मासा अगोदरच दुर्मिळ आहे. १ किलो व्हाईट गोल्ड अल्बिनो केव्हीयर बनविण्यासाठी पाच किलो गाभोळी लागते. प्रथम त्याची पावडर करून ती डिहायड्रेट केली जाते. त्यात त्याचे ८० टक्के वजन कमी होते. नंतर त्यात २२ कॅरेट सोने घातले जाते. १ किलो पदार्थासाठी १ कोटी ८६ लाख रूपये खर्च येतो. हा पदार्थ ब्रेड बटरसोबतही खाल्ला जातो तसेच तो अनेक जागी पेस्ट स्वरूपातही मिळतो.

वाल्टर यांच्या म्हणण्याप्रमाणे यासाठी ऑस्ट्रीयातील केव्हीयर मासाच हवा. कारण येथे जगातील सर्वोत्तम चवीचा केव्हीयर मासा मिळतो. येथे पाण्याचे प्रदूषण नाही व त्यामुळे माशाची चवही दर्जेदार असते.या पदार्थाचा केवळ १ चमचा संपूर्ण पदार्थाची चव बदलू शकतो आणि त्याला सुंदर स्वाद देऊ शकतो.

Leave a Comment