चोरांनी पळविला अख्खा रेले पूल


चोरी करताना सुद्धा काही चोर कमी श्रमाची चोरी करण्यास प्राधान्य देतात. त्यांना भुरटे चोर म्हणतात. काही तिजोरया फोडणे, बँका लुटणे अश्या धोकादायक चोऱ्या करणारे, कुणी खिसे कापणारे असतात. काही चोर मात्र खरोखरी मेहनती असतात. रशियात नुकतीच एक अशी चोरी उघडकीस आली असून या चोरांनी ५६ टन वजनाचा लोखंडी रेल्वे पूलच पळवून नेला आहे. रशियाच्या मार्न्मास्क या फिनलंडला जवळ असलेल्या ठिकाणी ही चोरी झाली असून स्थानिक लोकांना या चोरीची कानोकानी खबर लागली नाही हे विशेष.


डेली मेलच्या बातमीनुसार चोरीला गेलेला हा २३ मीटर लांबीचा पूल मोठ्या पुलाचा मधला भाग आहे. १६ मे रोजी तो तुटून नदीत पडला असा रिपोर्ट केला गेला होता मात्र २६ मे रोजी नवीन एरियल फोटो काढला गेला तेव्हा हा पूल गायबच झाला असल्याचे दिसून आले. हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. उम्बा नदीवरचा हा पूल तसा खूपच जुना आहे. या पूल चोरीची तक्रार किरोवास्क पोलीस ठाण्यावर केली गेली तेव्हा पोलिसांनी प्रथम मालकावरच चोरीचा आळ घेतला होता. मात्र नंतर मेटलवर्करनी हा पूल हळू हळू सोडवून त्याचे लोखंडी तुकडे नदीच्या पाण्यात टाकले असावेत आणि नंतर ते पाण्यातून काढून विकले असावेत असा तर्क पोलिसांनी केला आहे.

Leave a Comment