राष्ट्रीय परीक्षा बोर्डात 12वी पास तरुणांना नोकरीची संधी


नवी दिल्ली : ज्युनिअर असिस्टंट, सिनिअर असिस्टंट आणि ज्युनिअर अकाउंटंट पदांसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने अर्ज मागवले आहेत. या संदर्भात एनबीईकडून नोटिफिकेशन काढण्यात आले असून एकूण 42 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 42 पैकी 30 पदे ज्युनिअर असिस्टंटसाठी आहेत. तर, सिनिअर असिस्टंटसाठी 8 आणि ज्युनिअर अकाउंटंटच्या 4 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुकांना राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या natboard.edu.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2021 पासून सुरू होईल आणि 14 ऑगस्ट अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल.

कम्प्यूटर बेस्ड टेस्टच्या (CBT) आधारे राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेत 200 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असे. तसेच हे प्रश्न सोडवण्यासाठी 180 मिनिटे म्हणजेच 3 तासांची वेळ दिली जाईल. यासह निगेटिव्ह मार्किंग होईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जुलै 2021
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2021

  • सीबीटी परीक्षा- 20 सप्टेंबर 2021

राष्ट्रीय परीक्षा बोर्डामध्ये रिक्त पदांचा तपशील

ज्युनिअर असिस्टंट- 30

सिनिअर असिस्टंट- 08

ज्युनिअर अकाउंटंट- 04

अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी – 1500 + 18% जीएसटी

एससी/एसटी/दिव्यांग/महिला – निशुल्क

शैक्षणिक पात्रता

ज्युनिअर असिस्टंट- 12वी पास पाहिजे. तसेच कम्प्युटरबद्दल माहिती हवी. (विंडोज, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम, लॅप आर्किटेक्चर) याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

सिनिअर असिस्टंट- कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवीधर पदवी (Graduation).

ज्युनिअर अकाउंटंट- गणित आणि स्टॅटिस्टिक्ससोबत ग्रॅज्युएशनची डिग्री तसेच एनबीईने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कॉमर्समध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 27 वर्ष असले पाहिजे. एससी, एसटी गटातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची आणि ओबीसी गटातील उमेदवाराला 3 वर्षांची सवलत देण्यात येईल.