जिवंत खेकडे देणारे व्हेंडिंग मशीन आणि मॉल मध्ये मगर खरेदीसाठी चला या देशात

आज जगभरच्या अनेक देशात मोठमोठे शॉपिंग मॉल्स आहेत आणि जागोजागी विविध वस्तू देणारी व्हेंडिंग मशीन लागलेली पाहायला मिळतात. व्हेंडिंग मशीन सुविधेबद्द्दल जपान सर्वात आघाडीवर असलेला देश आहे. मात्र येथे अजून तरी जिवंत खेकडे देणारे मशीन नाही. त्यासाठी चीनला भेट द्यायला हवी.

करोना मुळे जगभर चीनविषयी राग आणि टीका व्यक्त होत आहे पण चीन मध्ये अशाही अनेक गोष्टी आहेत की त्या ऐकूनच एखाद्याचे डोके चक्रावून जाईल. चीन मध्ये सेन्सरशिप कडक आहे त्यामुळे चीन मधल्या अनेक घटना कधी जगासमोर येत नाहीत.

अश्या विचित्र कथा नक्कीच नवलाच्या म्हणता येतील. चीनच्या नानजिंग मेट्रो स्टेशनवर जिवंत खेकडे पुरविणारे व्हेंडिंग मशीन बसविले गेले आहे. प्लास्टिक बॉक्स मध्ये मिळणारे हे खेकडे त्यांचे आकार आणि क्वालिटीनुसार महाग स्वस्त मिळतात. सोबत क्रॅब व्हिनेगर सुद्धा मिळते. त्यामुळे नागरिक घरी जाताना हे रेडी टू कुक खेकडे नेऊन रात्रीच्या जेवणाची सोय करू शकतात.

अमेरिकेच्या वॉलमार्ट प्रमाणेच चीन मध्ये त्यांचे वॉलमार्ट आहे. खाल्ले जाणारे सगळे प्राणी येथे विकले जातात. अगदी मगरी आणि पाली सुद्धा. मगरी, पाली आईसबेडवर ठेवलेल्या असतात. शिवाय जिवंत मासे. पोर्क इतकेच नव्हे तर कुत्री मांजरांचे मांस सुद्धा येथे विकले जाते. चीन मध्ये आपण धान्य पिकवतो तशी झुरळांची शेती केली जाते. झुरळांचा वापर अनेक औषधे आणि सिरप मध्ये केला जातो.

अनेक देशात पोलीस विभागाकडे श्वान पथके आहेत. काही ठिकाणी घोड्यांची पथके आहेत. चीन मध्ये मात्र बदकांची पथके पोलीस ताफ्यात आहेत. हे पक्षी धोका जवळ असला तर एकत्र येतात आणि आक्रमक होतात. त्यांचा कर्कश्य आवाज आणि आक्रमक वर्तणूक यांची पोलिसाना मदत होते असे सांगितले जाते.