Microsoft Windows चे बहुप्रतिक्षित ‘नेक्स्ट जेनेरेशन’ या दिवशी होणार लॉन्च


मुंबई : याच महिन्यात आपल्या Windows ऑपरेटिंग सिस्टमचे ‘नेक्स्ट जेनेरेशन’ व्हर्जन मायक्रोसॉफ्ट लॉन्च करणार आहे. याबाबत कंपनीने घोषणा केली आहे की, एका वर्च्युअल इव्हेंटचे कंपनी 24 जून रोजी संध्याकाळी 8.30 वाजता आयोजन करण्यात येणार आहे. Microsoft चे सीईओ सत्या नडेला आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर पानोस पनयही या इव्हेंटमध्ये उपस्थित राहणार आहे.

कंपनीने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या Microsoft बिल्ड डेवलपर कॉन्फ्रेंस 2021 मध्ये यासंदर्भातील माहिती दिली होती. कंपनी लवकरच आपल्या Windows ऑपरेटिंग सिस्टमचा नेक्स्ट जनरेशन व्हर्जन लॉन्च करणार आहे. आता ते 24 जून रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये हे नवे व्हर्जन युजर्ससाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

यासंदर्भात Windows Central च्या रिपोर्टनुसार, ‘Sun Valley’ असे Windows ऑपरेटिंग सिस्टमच्या या नव्या व्हर्जनचे कोड नेम ठेवण्यात आले आहे. यामध्ये Windows चे नवं अॅप स्टोअर आणि युजर इंटरफेसच्या नव्या डिझाइनचाही समावेश आहे. त्याचबरोबर या नव्या व्हर्जनमध्ये काही खास अपडेट्सही पाहायला मिळणार आहेत.

Microsoft चे सीईओ सत्य नडेला यांनी बिल्ड डेवलपर कॉन्फ्रेंस 2021 दरम्यान म्हटले होते की, Windows ऑपरेटिंग सिस्टममध्ये आम्ही काही मोठे अपडेट करणार आहोत. हे गेल्या एका दशकापासून आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे बदल असणार आहेत. हे नवे अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आमचा हेतू याद्वारे डेव्हलेपर आणि क्रिएटर अधिक चांगल्या आर्थिक संधी देणे हा आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी स्वतः यावर काम करत आहे. Windows च्या या नेक्स्ट जेनरेशनबाबत मी खूपच उत्साही आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट गेल्या काही महिन्यांपासून Windows च्या नव्या अॅपवर काम करत आहे. त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टमच्या युजर इंटरफेसमध्ये अनेक महत्त्वाच्या बदलांवर काम केले आहे. या अॅप स्टोअरमध्ये डेव्हलपर्सही आपले अॅप तयार करुन टाकू शकणार आहेत. ज्यामध्ये क्रोम आणि फायरफॉक्सप्रमाणे ब्राउझर्सचाही समावेश असणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सना ऑपरेटिंग सिस्टिममध्ये विंडो 95 चे आयकॉन मिळू शकतात.