दोन दिवसांपासून बेपत्ता वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त


वसई – गेल्या दोन दिवसांपासून वसई विरार महापालिकेचे आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता झाल्यामुळे शहरात सध्या खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली असून तपास सुरु कऱण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होती. पण प्रेमसिंग जाधव अचानक बेपत्ता झाल्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव २ जून रोजी कार्यालयात आले होते. पण कामावरुन निघाल्यानंतर ते घऱी पोहोचलेच नाहीत. प्रेमसिंग जाधव बराच वेळ झाला, तरी घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी चौकशी सुरु केली. शोध लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत प्रेमसिंग जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

महापालिका क्षेत्रातील अनेक अनधिकृत बांधकामांवर प्रेमसिंग जाधव यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे नेमके काय कारण असावे याबाबात अनेक शंका उपस्थित होत असून पोलीस सध्या तपास करत आहेत.