विराटने वर्षात कमावले २२९ कोटी, फोर्ब्स यादीत एकमेव क्रिकेटर

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने सलग पाचव्या वर्षी एक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले आहे. फोर्ब्सच्या या यादीतील पहिल्या १०० खेळाडू मध्ये विराट एकमेव क्रिकेटर असून तो ३१.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २२९ कोटी रुपये कमावून ५९ व्या स्थानावर आला आहे. गतवर्षी या यादीत विराट २६ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १९७ कोटी रुपये कमावून ६६ व्या स्थानावर होता.

विराट आयपीएल मध्ये बंगलोर चँलेंजर्सचा कप्तान आहे. १२ महिन्यात त्याने कमावलेल्या २२९ कोटी पैकी २५ कोटी त्याला वेतन म्हणून मिळाले आहेत तर बाकी २०४ कोटींची कमाई त्याने जाहिरातीतून केली आहे. २०१९ मध्ये विराट १८९ कोटीच्या कमाईसह या यादीत १०० व्या नंबरवर होता.

या यादीत १ नंबरवर मिक्स्ड मार्शल आर्ट खेळाडू कॉर्नर मेकग्रेगर असून त्याची कमाई आहे १५१७ कोटी. त्याखालोखाल फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सी यांचा नंबर असून त्याची कमाई ९१९ कोटी तर फुटबॉलपटू रोनाल्डोची कमाई ८७५ कोटी असून तो तीन नंबरवर आहे. या यादीत दोन महिला असून दोघी टेनिस खेळाडू आहेत. जपानची नियोमी ओसावा ४०२ कोटींच्या कमाई सह महिला वर्गात पहिल्या तर एकूण यादीत १५ व्या क्रमाकांवर आहे तर सेरेना विलियम्स २५९ कोटीच्या कमाईसह ४४ व्या नम्बरवर आहे.

टेनिस स्टार रोजर फेडरर गतवर्षी अव्वल स्थानी होता मात्र यावर्षी तो सातव्या क्रमांकावर गेला असून त्याची कमाई आहे ६१२ कोटी.