राहुल गांधींनी उडवली ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषवाक्याची खिल्ली


नवी दिल्ली – पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर कोरोना, जीएसटी, लॉकडाउन, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अर्थव्यवस्था यासारख्या अनेक विषयांवर निशाणा साधला आहे. आता बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची खिल्ली देखील उडवली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. त्याचबरोबर अबकी बार करोडो बेरोजगार यासाठी हॅशटॅग वापरला. राहुल गांधी यांनी ट्वीट केल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये काँग्रेस आणि भाजपमधील कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असे ट्वीट केले होते. त्यांनी या ट्विटसोबत सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला होता. कोरोनाच्या उपलब्ध मात्रा आणि जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली यांचा कुठेही तालमेल लक्षात ठेवला नसल्याचा संदर्भ सुरेश जाधव यांनी दिला होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्याच पक्षाचे काही नेते, काही मित्र आणि काही पत्रकारांना अनफॉलो केले आहे. यामध्ये वायनाडच्या कार्यालयातील काही लोक आणि दिल्लीतील काही ज्येष्ठ पत्रकारांचाही समावेश आहे. राहुल यांच्या या कृतीची सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळांमध्येही सध्या जोरदार चर्चा आहे.