नेस्लेची मॅगी आणि अन्य उत्पादने पुन्हा संकटात

टू मिनिट मॅगी आणि नेस्लेची अनेक लोकप्रिय उत्पादने पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. विशेष म्हणजे नेस्लेने स्वतःच त्यांची अनेक उत्पादने हेल्दी नसल्याचे मान्य केले आहे. एका रिपोर्ट नुसार नेस्लेची मॅगी सह ६० टक्के उत्पादने आरोग्यास घातक असल्याचे आणि त्यात फूड आणि ड्रिंक्स उत्पादने समाविष्ट असल्याचे म्हटले गेले आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध होताच कंपनीने ई कॉमर्स माध्यमातून त्यांच्या उत्पादन विक्री वाढीसाठी अनेक ऑफर्स दिल्या आहेत.

रिपोर्ट नुसार नेल्सेचे कनफेक्शनरी आणि आईसक्रीम फारच धोकादायक आहे. त्यामानाने कॉफी सुरक्षित आहे. मॅगी पाठोपाठ नेस्लेची कॉफी लोकप्रिय उत्पादन आहे. ब्रिटनच्या बिझिनेस डेली फायनान्शीयल टाईम्सच्या रिपोर्ट नुसार २०२१च्या सुरवातीला टॉप एग्झीक्यूटीव्ह समोर एक प्रेझेन्टेशन दिले गेले त्यानुसार नेस्लेचच्या ३७ टक्के उत्पादनांना ३.५ रेटिंग आहे. यासाठी ५ हा बेंच मार्क आहे. याचा दुसरा सरळ अर्थ असा की बाकीची ६० टक्के उत्पादने मानकानुसार नाहीत.

नेस्लेने या संदर्भात म्हटले आहे की त्यांची काही उत्पादने कधीच आरोग्यदायी नव्हती. त्यात वेळोवेळी सुधारणा करूनही फार फरक पडलेला नाही. कंपनी उत्पादनातील पोषण मुल्यांची तपासणी करते आहे. उत्पादने चवदार पण आरोग्यदायी असावीत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कंपनी त्यांच्या उत्पादनाचा पूर्ण पोर्टफोलियो बदलण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.