सॅमसंग एस २१ लिमिटेड एडिशन फोन लाँच

जपान मध्ये होणार असलेल्या टोक्यो ऑलिम्पिक गेम्स २०२१ पूर्वी सॅमसंगने त्यांचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग गॅकेक्सी एस २१ लाँच केला आहे. हा ऑलिम्पिक गेम्स लिमिटेड एडिशन फाईव्ह जी  फोन असून नवीन आणि खास मॉडेल आहे.

वास्तविक ऑलिम्पिक गेम्स २०२० मध्ये नियोजित होत्या पण त्या करोना साथीमुळे रद्द कराव्या लागल्या. या गेम्सच्या निमित्ताने सॅमसंगने एस २० प्लस ऑलिम्पिक गेम्स २०२० लिमिटेड एडिशन लाँच करण्याची घोषणा केली होती पण स्पर्धा रद्द झाल्याने हा फोन लाँच केला गेला नव्हता. पण आता भारत सोडून बाकी देशात करोना नियंत्रणात आल्याने या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत म्हणून नवा लिमिटेड एडिशन सॅमसंग एस २१ लाँच केला गेला आहे.

जपान मध्ये या फोनची किंमत ७४७५० रुपये असून तो प्री ऑर्डर साठी उपलब्ध आहे. या फोनचा लुक खास असून त्यावर ऑलिम्पिक गेम्स वर्ल्डवाईड पार्टनर लोगो आहे. या फोन साठी ६.२ इंची डायनामिक अमोलेड टू एक्स डिस्प्ले, अँड्राईड ११ ओएस, ८ जीबी रॅम, १२८ आणि २५६ जीबी स्टोरेज ऑप्शन, ट्रिपल रिअर कॅमेरा सेट दिला गेला आहे. प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा असून १२ एमपीचे दोन कॅमेरे आहेत. सेल्फी साठी १० एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनला २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी दिली गेली आहे.