पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात २४२८ पदांसाठी परीक्षा, मुलाखतीविना थेट नोकर भरती


नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या पोस्ट खात्यामध्ये दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी आता १० जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या २४२८ पदांची भरती होणार असून त्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना १० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत याआधीही दोनवेळा वाढवण्यात आली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ एप्रिलपासून सुरुवात झाली असून १० जून उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे.

पदांची संख्या – महाराष्ट्रात या भरतीप्रक्रियेमधून एकूण २ हजार ४२८ जागा भरल्या जातील.

वेतन – पात्र उमेदवारांना दरमहा १० हजार रुपये एवढे वेतन मिळेल

वयाची अट – अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी १८ ते अधिकाधिक ४० वर्षे वय असणे बंधनकारक आहे.

भरती कशी होणार – GDS पदांसाठी कोणतीही परिक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही १० वी मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. याशिवाय आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.

नोकर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा