अजूनच आकर्षक होणार तुमचे लाडके WhatsApp


नवी दिल्ली – सध्या आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरून जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप वादात अडकलेले असतानाच आपल्या यूजर्ससाठी अनेक उत्तम फीचर्स लॉन्च करण्याच्या तयारीत व्हॉट्सअॅप आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर्स चॅटिंगचा अनुभव आकर्षक बनवू शकतात. या फीचर्सची सध्या टेस्टिंग घेण्यात येत असून हे फिचर येत्या काही आठवड्यात यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅपकडून लवकरच यूजर्सना अॅपचा कलर बदलण्याचे आकर्षक फीचर मिळणार आहे. या फीचरद्वारे यूजर चॅट बॉक्सचा आणि टेक्स्टचा रंग बदलू शकतील. यामुळे युजर्सच्या चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होणार आहे. सध्या हे फीचर टेस्टिंग मोडमध्ये असून ते लवकरच सुरू लाँच केले जाऊ शकते. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी इमोजी आणि स्टिकर्स अपडेट केले जातात.

आणखी एक चांगले फीचर लॉन्च करण्याची व्हॉट्सअॅपने तयारी केली आहे, ज्याचा वापर करून चॅट दरम्यान यूजर स्टिकर वापरू शकतील. सोप्या भाषेत, जेव्हा यूजर्स चॅटिंग दरम्यान एखादे वाक्य लिहितील, तेव्हा व्हॉट्सअॅपकडून त्यानुसार स्टिकरचे सजेशन मिळेल. त्यामुळे शब्दांऐवजी स्टिकर पाठवून चॅटिंग आणखी आकर्षक बनवू शकाल.

इतर अनेक फीचर्सवरही व्हॉट्सअॅप काम करत आहे, जे यूजर्ससाठी खूप उपयुक्त ठरतील. व्हॉट्सअॅप लवकरच एक फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या अकाऊंटमधून लॉग आउट करू शकतील. तसेच एकाच वेळी एकाहून अधिक डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप वापरता येईल.