दुसऱ्या महायुद्धात बेपत्ता सैनिकांचा अमेरिका भारतात घेणार शोध

अमेरिकेने दुसऱ्या महायुध्द काळात भारतात बेपत्ता झालेल्या ४०० हून अधिक सैनिकांचा शोध घेण्याच्या कामाला अधिक गती दिली आहे. त्यासाठी गुजराथच्या गांधीनगर मधील राष्ट्रीय फोरेन्सिक विज्ञान विश्वविद्यालयासोबत (एनएफएसयु) सहकार्य करार केला आहे. एनएसएफयु तज्ञ, अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या डीपीएए या संघटनेला या संदर्भात सहकार्य करणार आहे. डीपीएए ही संघटना युद्धात हरविलेल्या, बंदी झालेल्या सैनिकांच्या नोंदी ठेवण्याचे काम करते.

एनएफएसयुच्या डॉ. गार्गी या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाल्या, अमेरिकेला आम्ही या संदर्भात सर्वतोपरी मदत करणार आहोत. दुसरे महायुद्ध, कोरियन युध्द, व्हिएतनाम युध्द, शीतयुद्ध, व इराक पारस खाडी युद्धासह त्याअगोदर झालेल्या युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांचे अवशेष शोधून ते मायदेशी परत नेण्याचे प्रयत्न अमेरिका करत आहे. दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध आणि शीतयुद्धात अमेरिकेचे ८१,८०० सैनिक बेपत्ता झाले आहेत. त्यातील ४०० भारतात बेपत्ता झाले आहेत.