बीसीसीआयने जारी केले महिला क्रिकेट टीमचे टेस्ट किट

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट टीमचे टेस्ट किट जारी केले आहे. यावेळी कप्तान मिताली राज, टी २० कप्तान हरमनप्रीत कौर, अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी, तुफानी ओपनर स्मृती मंधना आणि अन्य क्रिकेटपटू उपस्थित होते. बीसीसीआयने ट्विटरवर त्याचे फोटो शेअर केले आहेत.

भारतीय महिला क्रिकेट टीम इंग्लंड मध्ये एक महिना साखळी सामने खेळण्यासाठी पुरुष टीमसह ब्रिटनचा दौरा करणार आहे. ब्रिस्टल येथे हा संघ एकच कसोटी खेळणार आहे तरीही त्यांना साउथम्टन येथे पुरुष टीम सोबत विलगीकरणात राहावे लागणार आहे. कसोटी नंतर तीन वनडे आणि टी २० सिरीज होणार आहे. सात वर्षानंतर प्रथमच भारतीय महिला क्रिकेट टीम कसोटी खेळणार आहे.

टी २० कप्तान हरमनप्रीतने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन जर्सीचे फोटो शेअर केले असून तिला ७ नंबरची जर्सी मिळाली आहे. पुरुष क्रिकेट टीममध्ये या नंबरची जर्सी महेंद्रसिंग धोनी वापरतो.